नवी दिल्ली – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील, असे त्यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांनी ही माहिती एका मुलाखतीत दिली. त्यांनी भारत जोडो यात्रेचीही कौतुक केले आहे. ते म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेचे नेतृत्व केल्याबद्दल राहुल गांधींचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे. इतिहासात अशी यात्रा झालेली नाही. ती यात्रा राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.
पुढे बोलताना कमनलाथ म्हणाले की, जगाच्या इतिहासात एवढी लांबची वाटचाल कोणीही केलेली नाही. गांधी घराण्याशिवाय इतर कोणत्याही कुटुंबाने देशासाठी इतके बलिदान दिलेले नाही. ते म्हणाले की, ‘राहुल गांधी सत्तेसाठी राजकारण करत नाहीत, तर ते देशातील जनतेसाठी करतात, जो कोणालाही सत्तेत बसवतो.