नवी दिल्ली : ‘तुम्ही ऐतिहासिक संसद भवनाला भेट देत आहात. आज जुन्या भवनाचा शेवटचा दिवस आहे. नवीन संसद उभारण्यासाठी लोकांनी अधिक मेहनत घेतली. जुनं संसद भवन हे ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असून, या जुन्या संसद इमारतीचे संग्रहालय करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले.
संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारकडून 8 विधेयके मांडली जाणार आहेत. आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी चांद्रयान-3 च्या यशाची आठवण करून दिली आणि चांद्रयानच्या माध्यमातून आपला तिरंगा चंद्रावर फडकत असल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले, ‘जुन्या संसद इमारतीचे संग्रहालय केले जाणार आहे. जुनं संसद भवन अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. तुम्ही ऐतिहासिक संसद भवनाला भेट देत आहात. आज जुन्या भवनाचा शेवटचा दिवस आहे. नवीन संसद उभारण्यासाठी लोकांनी अधिक मेहनत घेतली. संसदेचे हे विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत असून, हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे’.
चांद्रयान मोहिमेच्या यशाने तिरंगा ध्वज फडकवला आहे. शिवशक्ती पॉईंट हा प्रेरणास्रोत बनला आहे, तिरंगा पॉइंट आम्हाला अभिमानाने भरून टाकत आहे. अशा यशाच्या काळात तो सर्वत्र साजरा केला जात आहे. आधुनिकतेचे, विज्ञानाचे ठिकाण म्हणून जगाला तंत्रज्ञानाशी जोडले जात आहे. जेव्हा अशी क्षमता जगासमोर दिसते, तेव्हा अनेक शक्यता आणि संधी भारताच्या दारात उभ्या राहतात, असेही त्यांनी म्हटले आहे.