‘आम्ही त्यांच्या शिव्याही खाऊ आणि देशसेवाही करू’; नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

आज नरेंद्र मोदी यांचा मध्यप्रदेशमध्ये दौरा आहे. मुरैना येथे पार पडलेल्या एका सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं.

    मध्यप्रदेश : यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये 400 पार करण्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचार सभांचा धडाखा लावला आहे. आज नरेंद्र मोदी यांचा मध्यप्रदेशमध्ये दौरा आहे. मुरैना येथे पार पडलेल्या एका सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं. कॉंग्रेसला फक्त त्यांचं कुटुंब महत्त्वाचं असून त्यांनी मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्याच्या रांगेत बसवलं होतं असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेमध्ये केला.

    आम्ही त्यांच्या शिव्याही सहन करू

    नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशमधील प्रचारसभेमध्ये कॉंग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, ‘ते प्रसिद्ध, लोकप्रिय आहेत म्हणून ते आम्हाला शिवीगाळ करतात, पण आम्ही त्यांच्या शिव्याही सहन करू आणि भारत मातेची सेवाही करत राहू. मुरैना मतदारसंघ कधीच आपल्या संकल्पापासून मागे हटले नाहीये आणि कधीही डगमगणारही नाही. एखाद्या समस्येतून मुक्ती मिळाली तर परत त्या समस्येपासून दूर राहायचे हे मध्य प्रदेशातील जनतेला माहितीये. काँग्रेस विकास करत नाही हे त्यांना माहिती आहे. चंबळचे लोक काँग्रेसचा काळ कधीच विसरू शकत नाहीत. काँग्रेसने चंबळची ओळख ही वाईट कायदा सुव्यवस्था अशी केली होती. यादरम्यान काँग्रेसने मध्यप्रदेश राज्याला एका आजारी राज्यांच्या रांगेत उभं केलं होतं. काँग्रेससाठी कुटुंबचं सर्वस्व आहे. अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.

    काँग्रेसचे राजपुत्र दररोज मोदींचा अपमान करतात

    पुढे ते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले,  ‘तुम्ही ऐकलेच असेल की आजकाल काँग्रेसचे राजपुत्र दररोज मोदींचा अपमान करतात त्यात त्यांना मजा येते. ते काहीही बोलत असतात. मी सोशल मीडिया आणि टीव्हीवरील लोक म्हणतात की, पंतप्रधानांसाठी असं बोलणं चांगलं नाहीये. त्यांच्या तशा बोलण्याने लोक दु:खी आहेत. माझी सर्वात मोठी विनंती आहे की, तुम्ही दुःखी होऊ नका. ते प्रसिद्ध आहेत, पण आम्ही कामगार आहोत. भविष्यात ते खूप बोलतील. तुम्ही तुमचं डोकं खराब करू नका. त्यांच्या टीका सहन करण्यासाठीच आम्ही जन्मालो आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.