Tamilnadu New Chief Minister: तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विजय थलपती! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण
Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल! गणित आणि विज्ञानातील मार्क
मिळालेल्या माहितीनुसार, विजय थलपती यांनी राज्यपालांना त्यांच्याकडे आवश्यक बहुमत असल्याचे आश्वासन दिले असून, शपथविधीनंतर विधानसभेत ते सहजपणे बहुमत सिद्ध करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वी बुधवारी त्यांनी टीव्हीके आणि काँग्रेसच्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव गुरुवारी होणारा संभाव्य शपथविधी सोहळा रद्द करण्यात आला होता. राज्यपालांच्या हिरव्या कंदीलमुळे आता राजकीय अनिश्चितता संपुष्टात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विजय यांचा भव्य शपथविधी सोहळा येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी चेन्नईमध्ये पार पडण्याची दाट शक्यता आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी टीव्हीकेचे वरिष्ठ नेते, मित्रपक्षांचे प्रतिनिधी आणि देशभरातील दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. चित्रपटसृष्टीनंतर आता सक्रिय राजकारणात विजय थलपती कोणती नवी दिशा देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
तामिळनाडू निवडणुकीत विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. टीव्हीकेने विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकल्या, पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना केवळ १० जागा कमी पडल्या. टीव्हीकेने शपथविधी सोहळ्याची तयारी केली असली तरी, ते कोणत्या पक्षासोबत युती करणार आहेत हे अद्याप जाहीर केलेले नाही.
नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार
बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्यासाठी, विजय यांचा पक्ष, तामिळगा वेट्री कळघम, काँग्रेस, पीएमके, डावे पक्ष, सीपीएम आणि व्हीसीके यांसारख्या लहान पक्षांकडून पाठिंबा मिळवू शकतो. एकत्रितपणे, हे पक्ष बहुमताचा आकडा गाठण्यास मदत करू शकतात.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या.
डीएमकेने ५९ जागा जिंकल्या.
एआयएडीएमकेने ४७ जागा जिंकल्या.
काँग्रेसने ५ जागा जिंकल्या.
पीएमकेकडे ४ जागा आहेत.
इंडियन युनियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) २ जागा जिंकल्या.
सीपीआय, व्हीसीके आणि सीपीआय(एम) यांनीही प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.
भाजप, डीएमडीके आणि एएमएमकेएमएनकेझेड यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.






