भाजपचं 'ब्रह्मास्त्र' कॉंग्रेसला तारणार का? काय आहे पन्ना मॉडेल? वाचा सविस्तर
देशाच्या राजकारणात कॉंग्रेस कमकवून बनत आहे. लोकसभा निवडणूक वगळता महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान गुजरातच्या राजकारणात तीन दशकांपासून सत्तेबाहेर असलेली काँग्रेस आता पुन्हा एकदा आपले गमावलेले स्थान परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाचे नुकतेच झालेले राष्ट्रीय अधिवेशन या ‘मिशन गुजरात’चाच एक भाग मानला जात आहे. ८ एप्रिल रोजी झालेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात, काँग्रेसने ‘मिशन गुजरात’च्या रणनीतीवर चर्चा केली. यावेळी पक्षाने भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी त्यांचंच अस्त्र स्वीकारण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ‘पन्ना मॉडेल’ची चाचणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. या मॉडेलमुले कॉंग्रेस गमावलेलं वैभव परत मिळवू शकेल का? इतर राज्यांमध्ये रणनिती ठरवताना कोणते फायदे होतील? जाणून घेऊया…
Tahawwur Rana: तहव्वुर राणाला अखेर भारतात आणलाच; लवकरच NIA च्या न्यायालयात करणार दाखल
गुजरातमध्ये ६४ वर्षांनंतर झालेल्या दोन दिवसांच्या काँग्रेस अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. यामध्ये काँग्रेसने पक्षात आणि तळागाळात अनेक बदल घडवून आणण्यावर भर दिला आहे. इतकच नाही तर काँग्रेस कार्यकारिणी (CWC) सदस्य डॉ. शशी थरूर यांनी पक्षाला नवी सुरुवात करण्याचा सल्ला दिला आहे.
काँग्रेसने भूतकाळातील चुकांमधून शिकून भविष्याकडे पाहिले पाहिजे आणि रचनात्मक टीका आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. “काँग्रेस हा आशा दाखवणारा पक्ष असला पाहिजे, नाराजीचा नाही. भविष्याचा पक्ष असला पाहिजे, फक्त भूतकाळाचा नाही. आपल्याला सतत नकारात्मकतेचा नव्हे तर रचनात्मक टीकेद्वारे लोकांशी जोडता आलं पाहिजे,” असं शशी थरून यांनी म्हटलं आहे. युवक काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, जिल्हाध्यक्षांना अधिक राजकीय शक्ती देऊन, आम्हाला ब्लॉक, विभाग, गाव, ग्रामीण आणि बूथ पातळीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. यावेळी, संघटनात्मक सुधारणा, तळागाळातील सूक्ष्म व्यवस्थापन आणि पक्षातच असलेल्या ‘स्लीपर सेल्स’ सारख्या देशद्रोह्यांवर कारवाई करण्याच्या योजना आहेत.
सचिन पायलट यांच्या या विधानावरून स्पष्ट संदेश मिळतो की यावेळी काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात आघाडीवर खेळेल आणि नवीन रणनीतीसह प्रवेश करेल. या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि २०२६ मध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगालसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत, काँग्रेसला बुडत्या काळात ही रणनीती फायद्याची ठरू शकते.
२०२७ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याच्या राजकारणात भाजपचे एकतर्फी वर्चस्व आहे आणि काँग्रेस गेल्या तीन दशकांपासून गायब आहे. अशा परिस्थितीत, पक्ष भाजपला त्याच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी तयारी करत आहे. काँग्रेस आता सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर नव्या जोमाने लोकांपर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहे. पक्षाचे लक्ष केवळ संघटना मजबूत करण्यावर नाही तर निवडणूक पारदर्शकता सुनिश्चित करण्यावर देखील आहे. पक्षाच्या नेत्यांनी मतदार यादीतील अनियमितता आणि बनावट मतांविरुद्ध मोहीम चालवण्याबद्दलही बोलून दाखवलं आहे.
‘एक व्यक्ती, एक मत’ हा अधिकार खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल. ब्लॉक, डिव्हिजन, शहर आणि जिल्हा पातळीवर जुन्या पद्धतीने काम करण्याऐवजी नवीन पद्धतीने काम करण्याची तयारी सुरू आहे. मतदान केंद्रे, विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या आधारे नवीन युनिट्स तयार करण्यावर भर दिला पाहिजे, असा पक्षातून सूर उमटत आहे.
काँग्रेसच्या या रणनीतीचा गुजरातमध्ये काय फायदा होईल हे पाहणे बाकी आहे परंतु जर बिहार आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत हाच फॉर्म्युला अवलंबला गेला तर त्याचा निवडणूक निकालांवर परिणाम होईल. हेच कारण आहे की गुजरातकडे आता केवळ एक राज्य म्हणून नव्हे तर एक धोरणात्मक प्रयोगशाळा म्हणून पाहिले जात आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, “ही केवळ गुजरातसाठीची लढाई नाही, तर देशभरात काँग्रेसला बळकटी देण्याच्या दिशेने पहिलं पाऊल, असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मतं आहे.
गुजरातमध्ये काँग्रेस गेल्या ३० वर्षांपासून सत्तेबाहेर राहण्यामागे अनेक कारणे होती. राजकारणावर प्रभुत्व असलेल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “काँग्रेस कमकुवत होण्याचे मुख्य कारण भाजपची सुनियोजित रणनीती होती. भाजपने काँग्रेसमधील प्रभावी नेत्यांना पक्षात स्थान दिलं. शंकरसिंह वाघेला यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांच्या जाण्याने गुजरात काँग्रेसवर मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे कॉंग्रेस कमकुवत झाली आहे.
भाजप त्यांच्या संघटनेच्या अॅपमध्ये या सर्व स्वयंसेवकांची संपूर्ण माहिती देत आहे ज्यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, वय, शिक्षण, फोटो आणि त्यांचा मोबाईल नंबर समाविष्ट आहे. गाव, जिल्ह्यापासून भोपाळ आणि दिल्लीपर्यंतचे अधिकारी फक्त एका क्लिकवर कोणत्याही गावातील पन्ना प्रमुखांची माहिती मिळवता येईल. याशिवाय त्याच्याशी संपर्क साधता येतो. पक्ष वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि संपर्क साधण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या संदेशांव्यतिरिक्त, निवडणुकांसंबंधी इतर साहित्य देखील पाठवली जाणार होती. भाजपने गुजरातमध्ये या प्रकारचे मॉडेल यापूर्वी वापरले आहे. तिथे मिळालेल्या यशानंतर, संस्थेने मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये ते लागू करण्याचा निर्णय घेतला होता.