मल्लिकार्जुन खर्गे असतील पंतप्रधानपदाचे उमेदवार?; सोनिया गांधी यांनी दिले ‘हे’ संकेत

२०२४ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्या तरी, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. इंडिया अलायन्स लोकसभा निवडणूक-२०२४ नितीश कुमार किंवा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवू शकते अशी चर्चा होती.

    नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्या तरी, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. इंडिया अलायन्स लोकसभा निवडणूक-२०२४ नितीश कुमार किंवा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवू शकते अशी चर्चा होती.

    नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून किती पसंती मिळेल अशी शंका व्यक्त केली जात असतानाच काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी भारत आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे असू शकतात, असे संकेत दिले आहेत.

    विशेष उल्लेखनीय म्हणजे, ‘या ऐतिहासिक लढतीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी खर्गे हेच योग्य आहेत’, असे सोनिया म्हणाल्या होत्या. निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी सोनिया गांधी योनी अधिकृतपणे मल्लिकार्जुन खर्गे यांना मान्यता दिली आहे. पक्षाचे बडे नेतेही हा निर्णय मान्य करतील, अशी अपेक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.