पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो- फेसबुक)
श्रीनगर: जम्मू काश्मीर विधानसभा निडवणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला . काल पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान पार पडले आहे. काल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८. १९ टक्के मतदान पार पडले आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये राजधानी श्रीनगरमध्ये प्रचार सभेला संबोधित केले. काल पहिल्या टप्प्यातील मतदान हे सुरळीतपणे पार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेत काँग्रेस, नॅशनल काँग्रेस आणि पीडीपी पक्षावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेत म्हणाले, “काही दिवसांपूर्वी मी म्हटले होते की जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार आहेत. तेव्हापासून दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत हे लोक दहशतीत आहेत. या तिन्ही कुटुंबांना असे वाटते की त्यांच्यावर कोणी प्रश्न कसा काय उपस्थित करू शकतो? त्यांनी जम्मू-काश्मीरला केवळ भीती आणि अराजकता दिली आहे. पण आता जम्मू-काश्मीर या तीन राजघराण्यांच्या तावडीत राहणार नाही.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”जम्मू-काश्मीरला दहशतवाद आणि दहशतवादापासून मुक्त करायचे आहे. आता जम्मू-काश्मीरविरुद्ध कट करणाऱ्या प्रत्येक शक्तीला पराभूत करायचे आहे. इथल्या तरुणांना इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात आणि हा मोदीचा हेतू आहे आणि हा मोदीचे वचन आहे. आज संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू आहेत. मुलांच्या हातात पेन, वह्या आणि लॅपटॉप आहेत. आज, शाळांमध्ये आग लागल्याच्या बातम्या येत नाहीत. तर, त्याऐवजी नवीन शाळा, नवीन महाविद्यालये, एम्स, वैद्यकीय महाविद्यालये आणि आयआयटी बांधल्याच्या बातम्या येतात.” निवडणुकीत जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या मुख्य मुद्द्यावरही मोदींनी आपली भूमिका मांडली आणि जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा राज्य होणार, असे आपण देशाच्या संसदेत सांगितले आहे. फक्त भाजपचं हे वचन पूर्ण करेल. आम्ही जे सांगतो ते करतो.”
#WATCH | Prime Minister Narendra Modi attends public rally in Srinagar, Jammu and Kashmir.
J&K will be voting for its 90-member assembly in three phases. The first phase of voting was held on September 18, the other two rounds will be held on September 25 and October 1.… pic.twitter.com/twjmWF1LZV
— ANI (@ANI) September 19, 2024
कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच केंद्रशासित प्रदेशात तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ जागांवर मतदान पार पडले आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर आणि गेल्या १० वर्षांतील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. ५ ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७०रद्द केले. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.