अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटनावरुन (Ram Mandir Inauguration) देशामध्ये भक्तीमय वातावरण असताना विरोधकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. दरम्यान, मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाशिकमधील काळाराम मंदिरमध्ये (Nashik Kalaram Temple) दर्शन घेणार आहेत. याबद्दल खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माहिती दिली होती. यावर आता भाजप (BJP) नेत्यांनी ताशेरे ओढत टीका केली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. ठाकरे गटाची सभा म्हणजे श्रद्धांजली सभा आहे अशी जहरी टीका नितेश राणे यांनी ठाकरे गटावर केली.
उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचे जाहीर केले आहे. 22 आणि 23 तारखेला नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. ती खरी म्हटलं तर श्रद्धांजली सभा आहे. मातम मनवण्यासाठी हे सगळे एकत्र येत आहेत. असा घणाघात नितेश राणे यांनी केला
पुढे ते म्हणाले, जी संघटनाच जिवंत नाही, जिचे अस्तित्वच नाही, तिचे चिन्ह असलेले मशाल राहील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन दिवसांच्या अधिवेशनाकडे कुणी ढूंकूनही पाहणार नाही, अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे.