मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. तर, शिवसेनेच्या 55 पैकी 38 आमदारांच्या सहीचं पत्रं शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. तर, शिवसेनेच्या मंत्र्याच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांना कल्पना होती, अशी माहिती आता समोर येत आहे.
सध्या सर्व देशाच लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या ६ दिवसापासून अनेक घडामोडी घडत आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. अशातच एक माहिती समोर येत आहे की, शिवसेनेच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांना कल्पना होती, तसा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता, अशी माहिती आहे.
[read_also content=”‘मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानं शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण काढलं’ एकनाथ शिंदेचं ट्विट चर्चेत! https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-says-in-tweet-protection-of-shiv-sena-mlas-by-order-of-chief-minister-and-home-minister-nrps-296763.html”]
शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे, काळजी घ्या असा गुप्तचर विभागाचा रिपोर्ट होता. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. गेली वर्षभर नाराजी असल्याचे गुप्तचर विभागाचे इनपूट होते. या इनपूटकडे दुर्लक्ष करण्यात आलं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडं दुर्लक्ष केलं का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
[read_also content=”सीबीएससीने अभ्यासक्रमातून इस्लामचा उदय, मुघल साम्राज्य धडे वगळले https://www.navarashtra.com/maharashtra/the-cbse-dropped-lessons-from-the-syllabus-nrgm-296757/://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-says-in-tweet-protection-of-shiv-sena-mlas-by-order-of-chief-minister-and-home-minister-nrps-296763.html”]