मुंबई : कोरोनाच्या दोन वर्षानंतर लाडक्या बाप्पाचे जंगी स्वागत होत आहे. कोरोनाच्या संकटामुळं सर्वांच्या आवडीचा गणपती हा सण (Ganpati festival) साजरा करता आला नव्हता. पण आता सर्व काही खुले झाले असल्यामुळं मनमोकळेपणाने सर्व सण साजरे करता येणार आहेत. त्यामुळं १४ विद्या आणि ६४ कलांची दैवत असलेलं लाडका बाप्पा अर्थात श्री. गणपतीचा सणाची गणेशभक्त चातकाप्रमाने आतुरतेनं वाट पाहत आहेत. मुंबई, पुणे आदी शहरात नोकरी करणारे चाकरमानी गणपतीच्या सणासाठी चार दिवस का, असेना पण आपल्या गावी जातात. गणपतीच्या सणासाठी (Ganpati festival) कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील (Kokan and western Maharashtra) नोकरवर्ग हमखास गणपतीसाठी गावी जात असतो. दरम्यान, कोकणात जाण्यासाठी तर चक्क रेल्वेचे पाच-सहा महिने आधी तिकिट बुक करावे लागते. तेव्हा कुठे बसण्यास जागा मिळते. पण सुट्टीच्या कारणामुळं अनेकांना तिकिट बुक (Ticket book) करणे शक्य होत नाही. त्यामुळं त्यांना एसटी किंवा खासगी (ST and private travels) बसचा पर्याय निवडावा लागतो.
[read_also content=”राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून खेळाडूचा सत्कार https://www.navarashtra.com/maharashtra/national-sports-day-player-felicitated-by-girish-mahajan-320510.html”]
खासगी ट्रव्हल्सवाल्यांची लूट
दरम्यान, सध्या गणपतीसाठी गावी जाण्याची सर्वांची लगबग सुरु आहे, पण रेल्वेची सर्व तिकिच आधीच बुक असल्यामुळं एसटी किंवा खासगी बसने मुंबईतील चाकरमान्यांना गावी जावे लागत आहे, पण सणासुदीच्या काळात खासगी बस ट्रव्हल्सवाल्याकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. एरवी 500 किलोमीटर प्रवासासाठी 600 ते 800 रुपये एवढे तिकिट आकारले जायचे पण आता 1000 ते 1200 रुपये एवढे तिकिट घेतले जात आहे, त्यामुळं प्रवाशांच्या संतप्त भावना असून, सणासुदीच्या काळात गावी जाण्यास दुसरा पर्याय नसल्यानं आपल्याकडून खासगी ट्रव्हल्सवाले अव्वाच्या सव्वा तिकिटाचे पैस घेत असून, प्रवाशांकडून लूट सुरु आहे, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.
कळवा, विटावा भागात मोफत बससेवा
एकिकडे गणपतीला गावी जाण्यासाठी खासगी ट्रव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरु असताना, दुसरीकडे माणुसकिचे दर्शन सुद्धा होत आहे, कोकणात जाण्यासाठी आमदार नितेश राणेंनी मोदी एक्सपैस मोफत रेल्वे सुरु केली आहे. तसेच ठाणे, कळवा व विटावा भागातून गावी जाण्यासाठी तीस मोफत बस समाजसेवक संतोष तोडकर यांनी रविवारी सोडल्या आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, कराड, सांगली, सातारा आदी भागात समाजसेवक संतोष तोडकर यांनी खास गणपतीला जाण्यासाठी मोफत 30 बस रविवारी सोडल्या आहेत. एकिकडे गणपतीला गावी जाण्यासाठी खासगी ट्रव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरु असताना, दुसरीकडे समाजसेवक संतोष तोडकर यांच्या रुपाने माणुसकिचे दर्शन सुद्धा होत आहे, त्यामुळं या बसमधून गेलेल्या प्रवशांनी आनंद व्यक्त केला असून, समाजसेवक संतोष तोडकर यांचे आभार मानले आहेत, व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.