देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासात देशात 7,171 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 51,314 वर गेली आहे. तर, गेल्या 24 तासात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल असुन देशातील एकूण मृतांची संख्या 5,31,508 वर गेली आहे.
गेल्या 24 तासात देशात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,508 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशातील सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.11% आहेत. कोरोना रुग्णांचा दैनंदिन पॅझिटिव्हिटी रेट 3.69% वर पोहोचला आहे, तर साप्ताहिक पॅझिटिव्हिटी रेट 4.72% वर आहे. तसेच, राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.70% टक्के नोंदवला गेला. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,56,693 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4.49 कोटी कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.
COVID-19 | India records 7,171 new cases in 24 hours; Active caseload at 51,314 — ANI (@ANI) April 29, 2023
राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कर्नाटकात 1396 सक्रिय प्रकरणे असुन केरळमध्ये 11811 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली. महाराष्ट्रात 4717 सक्रिय प्रकरणे, गुजरातमध्ये 1396 प्रकरणे, दिल्लीत 3853 प्रकरणे, तामिळनाडूमध्ये 3126 सक्रिय प्रकरणे, हिमाचल प्रदेशात 1087 प्रकरणे, हरियाणामध्ये 3963 प्रकरणे, छत्तीसगडमध्ये 2521 प्रकरणे, राजस्थानमध्ये 3023, उत्तर प्रदेशात 3239 प्रकरणे आणि पश्चिम बंगालमध्ये 423 प्रकरणे आहेत.