भारतीय फलंदाजांना झालेय तरी काय, गोलंदाजांनी आणून दिलेला सामना फलंदाजांनी गमावला, पाहूया सविस्तर रिपोर्ट
IND vs AUS 4th Test Melbourne Cricket Ground : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या टेस्ट सामन्यात कांगारूंनी टीम इंडियावर 184 धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी अत्यंत कष्टाने आणून दिलेला सामना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा हातातून गमावल्याचे चित्र या सामन्यात दिसून आले. टीम इंडियाचे दिग्गज पूर्णपणे यामध्ये अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. अगदी कर्णधार रोहित शर्मापासून ते वॉशिंग्टन सुंदरपर्यंत सर्वच फलंदाज फ्लॉप ठरले. भारतीय संघाने चौथ्या टेस्टमध्ये बॅटींग ऑर्डरची आवश्यकता पाहून अगदी 9 व्या क्रमांकापर्यंत बॅटींग ऑर्डर ठेवलेली पाहायला मिळाली. एवढे सर्व असूनही भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. यामध्ये सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि पंत सोडला तर एकही फलंदाजाने 10 चा आकडा पार केला नाही.
हातातील सामना गमावला
मेलबर्न टेस्टमध्ये अगदी शेवटच्या दिवशी सामना निर्णायक मोडवर आलेला होता. यामध्ये भारताला फार मोठे लक्ष्य नव्हते अवघ्या 340 धावांचे टार्गेट होते. टीम इंडियाची बॅटींग ऑर्डर पाहता हे लक्ष्य भारतीय संघ सहतेने पार करेल असेच वाटत होते. परंतु, भारताचे दिग्गज पुन्हा एकदा अपयशी ठरले. ज्या दिग्गज खेळाडूंकडून मोठी अपेक्षा होती, ते सर्व फलंदाजांनी आज निराश केले. यामध्ये कर्णधार रोहित शर्मापासून ते नुकताच शतक ठोकलेल्या नितीशकुमार रेड्डीसुद्धा अपयशी ठरला,
रोहित शर्मा दोन्ही डावांत अपयशी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरलाय, एक फलंदाज म्हणूनसुद्धा तो अपयशी ठरला तर कर्णधार म्हणूनसुद्धा त्याने निराश केले. या सामन्यात दोन्ही डावांमध्ये तो केवळ 12 धावा करू शकला. त्याला पुन्हा एकदा पॅट कमिन्सने शिकार बनवले. त्याच्या कॅप्टनसी मध्ये दोन्ही टेस्ट भारताच्या हातातून गेल्या. या बदल्यात बुमराहने पर्थ कसोटीमध्ये चांगली कॅप्टन्सी करीत सामना जिंकला.
विराटने केले निराश
विराट कोहली ज्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा हिरो मानला जात होते, त्यानेसुद्धा निराश केले. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीला नको ते ब्रिद वापरून त्याची खिल्ली उडवली. परंतु, त्याला याचे उत्तर देण्याची हीच खरी वेळ होती. परंतु, तोदेखील यामध्ये अपयशी ठरला. आजसुद्धा त्याची भारताला गरज असताना तो आपली विकेट गिफ्ट देऊन आला. बाहेरच्या चेंडूला पुन्हा एकदा टच करण्याचा त्याने प्रयत्न करीत आपली विकेट मिचेल स्टार्कला देऊन आला.
गरज असताना ऋषभपंत आणि जडेजा फ्लॉप
शेवटच्या दिवशी ऋषभ पंतवर सर्वाधिक मदार असताना आणि त्याच्याकडून आशा असताना त्याने देखील निराशच केले. दोन्ही डावांमध्ये त्याने चुकीचा शॉट मारत आपली विकेट गमावली. तो स्वतःसुद्धा या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त करीत असेल. रवींद्र जडेजासुद्धा काही विशेष करू शकला नाही. शेवटच्या फळीत येऊन तो काही तरी कमाल करेल असेल वाटत होते परंतु त्यानेही आपली विकेट सोडली.