भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल (फोटो- ट्विटर)
भारताने 20 ओव्हर्समध्ये केल्या धावा
संजू सॅमसनने करून दिली जोरदार सुरुवात
मुंबईच्या वानखेडेवर सुरू आहे दुसरी सेमीफायनल
T20 World Cup 2026 Live India Vs England Semifinal: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची दुसरी सेमीफायनल खेळवली जात आहे. दरम्यान इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारताने या संधीचा फायदा उचलून 20 ओव्हर्समध्ये 253 धावा केल्या. भारताने इंग्लंडला 254 धावांचे लक्ष्य दिले आहे. सेमीफायनल जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे.
भारताकडून संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या यांनी तूफान खेळी केली. संजू सॅमसनने 89 धावांची महत्वाची खेळी केली. त्यापाठोपाठ ईशान किशनने 17 चेंडूत 39 धावा केल्या. अभिषेक शर्माला चांगली खेळी करता आली नाही. भारताने सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे. आता इंग्लंडचा संघ कसा खेळ करते ते पहावे लागणार आहे.
इंग्लंडला विजयासाथी 254 धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागणार आहे. 5 तारखेला अहमदाबाद येथे होणाऱ्या फायनलचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज जो संघ जिंकेल तो 5 तारखेला न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. शिवम दुबेने 43 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 11 धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्याने 27 तर तिलक वर्माने 21 धावा केल्या.
Innings Break!#TeamIndia register the highest team total in ICC Men's T20 World Cup knockouts 🔥👏 Over to the bowlers to defend this 🙌 Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/IKEpHNKHJT — BCCI (@BCCI) March 5, 2026
सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, हॅरी ब्रुक पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. कोणता कर्णधार पदार्पणातच त्यांच्या संघाला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात यशस्वी होईल हे पाहणे बाकी आहे. एकंदरीत, आजचा सामना खूपच मनोरंजक असेल हे निश्चित दिसते.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद






