T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास (Photo Credit- X)
भारतापूर्वी, २०२४ च्या टी-२० विश्वचषकात, वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या ६ षटकांत १ विकेट गमावून ९२ धावा केल्या होत्या. आता भारताने हा विक्रम केला आहे. भारताने ६ षटकांत एकही विकेट न गमावता ९२ धावा केल्या. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी शानदार फलंदाजी केली.
The joint-highest powerplay total in #T20WorldCup history, and in the final! 🔥 pic.twitter.com/GS0Pj0JaiE — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 8, 2026
२०१४ मध्ये आयर्लंडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ९१/१ धावा करणारा नेदरलँड्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१६ मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डावाच्या पहिल्या सहा षटकांत ३ गडी गमावून ८९ धावा केल्या होत्या. दरम्यान, त्याच विश्वचषकात भारताने नामिबियाविरुद्ध सहा षटकांत १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या ११ षटकांत १ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी ७.१ षटकांत पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली.
नाणेफेक गमावता भारताला फलंदाजी मिळाली आणि टीम इंडियाने कोणतीही दया मया न दाखवता किवी संघाला धुवायला सुरुवात केली. भारतीय ओपनरने जी तोडफोड करायला सुरुवात केली ते थांबलेच नाही. पूर्ण विश्वचकात फार्म न मिळालेला अभिषेक शर्मा फायनला तापला आणि त्याने २१ चेंडून ५२ धावांची घातक खेळी केली. तसेच आपल्या जबरदस्त फार्म असलेल्या संजूने आज पुन्हा चमत्कार केला. त्याने ४६ चेंडून ५ चौकार आणि ८ षटकारासह ८९ धावांची खेळी केली. भारतीय संघात पुनरागमन करणार इशान किशन या सीजनमध्ये चांगलात गाजला त्याने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने बरोबर फिनिशरची भूमिका निभावली त्याने ८ चेंडूत दोन षटकार आणि ३ चौकारसह २६ धावा करत कहर केला आणि किवीसंघासमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून नशीम जेम्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर रचिन रवींद्र आणि मॅट हॅनरी एक विकेट मिळाली.
टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.






