काठमांडू : कोरोनाच्या सतर्कतेच्या (Corona Alert) दृष्टिने भारतीय पर्यटकांना (Indian Tourist) नेपाळमध्ये (Nepal) पर्यटनास येण्यासाठी बंदी (No Entry To Tourist) घातली आहे. कोरोना तपासणीदरम्यान भारतातील काही पर्यटक कोरोना संक्रमित आढळल्याने त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या पर्यटकांमध्ये ४ लोक संक्रमित आल्याने त्यांना परत पाठव्यात आले आहे.
नेपाळमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने (Government Of Nepal) हा निर्णय घेतला असून भारतातील हे पर्यटक पश्चिम नेपाळच्या बैताडी जिल्हातील (Baitadi District) झूलाघाट सिमेद्वारे पोहचले होते. बैताडीमधील आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की ४ भारतीय पर्यटक कोरोनाबाधित झाले आहेत.
भारतातून आलेल्या अनेक नेपाळी नागरिकांना कोविड-१९ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ज्या भारतीय पर्यटकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यांना देशात येण्यास बंदी घातली आहे. बैताडी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा धोका खूप जास्त आहे, कारण त्याची सीमा भारताला लागून आहे, असे ते म्हणाले.