मुंबई : आमदार अपात्रतेच्या निर्णयावरुन (ShivSena MLA disqualification) ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेत राज्य सरकारसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अनेक फोटो, व्हिडिओ व कागदपत्रे सादर करत ठाकरे गटाने (Thackeray group) पुरावे सादर केले. यावेळी ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भर स्टेजवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाया पडले. या व्हिडिओवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहे.
राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय देताना 2018 ची कार्यकारिणी सभेचे पुरावे नसल्याचे सांगत 1999 सालची शिवसेनेची घटना ग्राह्य धरण्यात आली. याबाबत पुरावा सादर करताना ठाकरे गटाने अनेक व्हिडिओ समोर आणले आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली होती. तेव्हा एकनाथ शिंदे हे स्टेजवरच उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले होते. एका युजरने हा व्हिडिओ ट्वीटवर शेअर केला आहे.
In 2018, #UddhavThackeray as #Shivasena President selected #Gaddarnath #EknathShinde as a Shivsena Leader.
Leader is 2nd to President. There are 13 Shivsena Leaders. 9 Elected, 4 Selected. Shinde was selected. He Betrayed.#EkThaEknath#महा_पत्रकार_परिषद pic.twitter.com/YMATESCEhy— शिवबा ची तलवार ?️ (@shivbachitalwar) January 16, 2024
त्यावेळीची राष्ट्रीय कार्यकारिणी 13 सदस्यांची होती. त्याच बैठकीत चंद्रकांत खैरे, अनंत गिते, आनंदराव अडसूळ यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली होती. नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना गुच्छ देऊन स्वागत केले याचा व्हिडीओ अनिल परब यांनी यावेळी दाखविला. ही सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिले होते. असे देखील अनिल परब यांनी जाहीर केले. यामुळे नक्की शिवसेना ही शिंदे गटाची की ठाकरे गटाची याबाबत सर्वांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.