अपेंडिक्स कॅन्सरची लक्षणे काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)
आतापर्यंत अपेंडिक्स कर्करोग हा एक दुर्मिळ आजार मानला जात होता, जो दरवर्षी दर दशलक्षात फक्त १-२ लोकांना होतो असे अभ्यासातून सांगण्यात येत होते. मात्र अलिकडच्या संशोधनातून धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हा कर्करोग आता तरुणांना, विशेषतः जनरेशन-एक्स आणि मिलेनियल्सना वेगाने जखडून ठेवत आहे असे सांगण्यात येत आहे.
‘अॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, जुन्या पिढीच्या तुलनेत जनरेशन-एक्समध्ये अपेंडिक्स कर्करोगाचे रुग्ण तीन पटीने आणि मिलेनियल्समध्ये चार पटीने वाढले आहेत. नक्की या शोधात काय सांगण्यात आले आहे आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अभ्यास
या संशोधनात असे आढळून आले की आता प्रत्येक तीन अपेंडिक्स कर्करोगाच्या रुग्णांपैकी एक रुग्ण ५० वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. त्या तुलनेत, कोलोरेक्टल कर्करोगाचा फक्त आठवा रुग्ण ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आढळतो. तज्ञांचा असा विश्वास आहे की अपेंडिक्स कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे इतकी सौम्य आणि सामान्य आहेत की ती अनेकदा दुर्लक्षित केली जातात. अशा पाच लक्षणांबद्दल जाणून घेऊया ज्यांना पोटाच्या सामान्य समस्या समजून दुर्लक्षित केले जाते.
उजव्या बाजूला पोटात सतत दुखणे
सतत पोटात दुखत असेल तर काळजी घ्या
अपेंडिसाइटिस हा वायू किंवा मासिक पाळीच्या क्रॅम्पसारखा वाटू शकतो, परंतु अपेंडिक्सच्या काही ट्यूमरमुळे उजव्या खालच्या ओटीपोटात सतत किंवा अधूनमधून वेदना होऊ शकतात. अपेंडिसाइटिसच्या तीव्र वेदनेप्रमाणे, ही अस्वस्थता सहसा सौम्य आणि सतत असते. ती दैनंदिन जीवनात लगेच व्यत्यय आणत नाही, म्हणूनच त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
40 टक्के होईल कॅन्सरचा धोका कमी, करा 5 कामं आणि रहा बिनधास्त!
सतत बद्धकोष्ठता वा जंत होणे
जंत होत असल्यास दुर्लक्ष करू नका
आहारातील बदल, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा तणावाशी संबंधित समस्यांमुळे लक्षणे दिसू शकतात. अपेंडिक्स ट्युमरमुळे आतड्यांच्या हालचालींमध्ये लहान बदल होऊ शकतात, ज्यामध्ये बद्धकोष्ठता, अतिसार यांचा समावेश आहे. हे बदल नेहमीच होताता असे नाही तर ते कायमचे असू शकतात. अपेंडिक्स मोठ्या आतड्याशी जोडलेले असल्याने, लहान ट्युमरदेखील आतड्यांच्या वर्तनावर परिणाम करू शकतात असे सांगण्यात येते
पोटात सतत सूज येणे
जास्त खाण्यामुळे किंवा लैक्टोज इन्टॉलरन्समुळे सामान्य पोटफुगी. काही प्रकारचे अपेंडिक्स कर्करोग, विशेषतः म्युसिनस एडेनोकार्सिनोमा, जाड थर निर्माण करतात. यामुळे पोटात द्रव जमा होऊ शकतो, ज्यामुळे पोटफुगी किंवा पोट भरल्यासारखे वाटू शकते. ही नेहमीची अल्पकालीन पोटफुगी नाही तर काही आठवडे टिकू शकते.
थकवा आणि एनिमिया
सतत थकवा जाणवू शकतो
पूर्वी चुकीच्या आहारामुळे किंवा जीवनशैलीमुळे लोहाची कमतरता समजली जात असे, ट्यूमरमुळे होणारा दीर्घकालीन अंतर्गत रक्तस्त्राव सौम्य अशक्तपणा निर्माण करू शकतो, जो सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षात येत नाही. यामुळे थकवा, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. ही लक्षणे अस्पष्ट असतात आणि बहुतेकदा दररोजच्या थकवा किंवा झोपेच्या कमतरतेमुळे ती उद्भवतात
अचानक वजन कमी होणे
वजन कमी होत असेल तर लक्ष द्या
ताण किंवा निरोगी खाण्यापिण्याशी संबंधित वजनातील चढउतार. काही अपेंडिक्स कर्करोग चयापचय किंवा पोषक तत्वांच्या शोषणावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे हळूहळू, अनावधानाने वजन कमी होते. आहार आणि क्रियाकलाप पातळी समान राहिल्यावरही हे होऊ शकते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.