ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय
धूळ , माती आणि प्रदूषणामुळे आरोग्यासोबतच त्वचेचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे, मुरूम येणे, ब्लॅकहेड्स इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर किंवा नाकावर काहीवेळा मोठ्या प्रमाणात ब्लॅकहेड्स येऊ लागतात. ब्लॅकहेड्स आल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्ट्रीप किंवा क्रीम्स आणून लावतात. मात्र या प्रॉडक्टच्या वापरामुळे फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. (फोटो सौजन्य – iStock)
Underarms Hair Remove: घामाच्या दुर्गंधीचं हमखास कारण असणाऱ्या काखेचे केस काढणं योग्य की अयोग्य?
घरगुती पदार्थ त्वचेमधील नैसर्गिक सौदंर्य कायम टिकवून ठेवतात, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर, नाकावर आलेले ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.या पदार्थांच्या वापरामुळे त्वचेवरील सर्व ब्लॅकहेड्स निघून जातील आणि त्वचा स्वच्छ होईल.
जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. याशिवाय बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवू शकता. यासाठी बेकिंग सोडा वाटीमध्ये घेऊन त्यात पाणी मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावून २० मिनिटांपर्यंत तशीच ठेवून द्या. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होईल आणि चेहरा सुंदर दिसेल. मात्र बेकिंग सोडा वापरताना पॅच टेस्ट करून पाहावी, अन्यथा त्वचा खराब होऊ शकते.
चवीला आंबट असलेले टोमॅटो आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करतात. टोमॅटो त्वचेला लावल्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होईल आणि त्वचा अधिक चमकदार दिसेल.ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी टोमॅटोचे तुकडे करून त्यातील एक भाग चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील ब्लॅकहेड्स कमी होतील आणि चेहरा सुंदर आणि ग्लोइंग दिसेल.
थ्रेडींग-वॅक्सिंगची भीती वाटते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून करा अप्पर लिप्स
त्वचेच्या छिद्रांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून दोनदा वाफ घेणे आवश्यक आहे. वाफ घेतल्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि ब्लॅकहेड्स कमी होऊन जातात. यासाठी गरम पाणी करून वाफ घ्यावी. त्यानंतर कॉटनच्या कापडाने त्वचा स्वच्छ पुसून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सच नाहीतर त्वचा सुद्धा स्वच्छ होईल.