(फोटो सौजन्य: Pinterest)
लोकांमध्ये पर्यटनाची आवड सातत्याने वाढत चालली आहे. बहुतेक लोक सुट्टीच्या दिवशी कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅन करतात. त्यातही साहसी खेळांची क्रेझ तरुणांमध्ये फार चर्चेत आहे. आता बहुतेक लोक बंजी जंपिंगपासून ते झिप लाईन, राफ्टिंग, पॅराग्लायडिंग करताना दिसून येतात. या ऍक्टिव्हिटीज करून ते त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर देखील करतात. असाच एक साहसी खेळ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्याचा अनुभव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.
आम्ही ज्या साहसी खेळाविषयी बोलत आहोत तो खेळ म्हणजे स्कूबा डायव्हिंग. हा खेळ पाण्याखाली अनुभवला जातो. यात तुम्हाला पाण्याच्या आतील जग पाहायला मिळत. लोक एक खास पोशाख घालून समुद्रात जातात. याद्वारे समुद्राखालील जग पाहण्याची संधी मिळते. यामध्ये, डायव्हर्स एक खास प्रकारचा स्कूबा टँक आणि मास्क घालतात. यामुळे त्यांना पाण्याखाली आरामात श्वास घेता येतो. स्कूबा डायव्हिंगची मजा फक्त स्वच्छ आणि खोल पाण्यातच घेता येते. आज आम्ही तुम्हाला असे एक ठिकाण सांगणार आहोत जिथे तुमचा स्कुबा डायव्हिंगचा एक अद्भुत अनुभव अनुभवू शकता. यासोबतच भारतातील कोणती ठिकाणे स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम आहेत ते आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
स्कूबा डायव्हिंग म्हणजे काय?
स्कूबा डायव्हिंग म्हणजे पाण्याच्या आत श्वास घेण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर करून पाण्याखालील जगाचा शोध घेणे. यामध्ये, डायव्हर ऑक्सिजन टँक, मास्क, पंख (पायांवर घातलेले तरंगणारे उपकरण) आणि शरीरावर वेटसूट घालून पाण्यात प्रवेश करतो. ही क्रिया पूर्णपणे प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली केली जाते. याच्या मदतीने समुद्राच्या आतील खोल जग पाहता येते. तुम्ही समुद्री वनस्पती, मासे, समुद्री जीव अशा अनेक गोष्टी ज्या आपण कधीही पहिल्या नाही त्या या ऍक्टिव्हिटीमध्ये पाहू शकता. पर्यावरण समजून घेण्याचा आणि निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
अंदमान आणि निकोबार बेटे
जेव्हा जेव्हा स्कूबा डायव्हिंगचा उल्लेख केला जातो तेव्हा लोकांच्या मनात सर्वात आधी अंदमान आणि निकोबार बेट येते. अंदमान हे भारतातील सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंग डेस्टिनेशन मानले जाते. इथल्या स्वछ पाण्यात तुम्ही स्कूबा डायव्हिंगचा सुंदर अनुभव घेऊ शकता. येथे तुम्हाला कासव, मोरे ईल, ट्रेव्हली, मांता रे आणि बॅटफिश अशा विविध गोष्टी पाहायला मिळतील.
गोवा
भारतात फिरण्यासाठीचे ठिकाण म्हटलं की, सर्वांच्या मनात सर्वात आधी गोव्याचं नाव येत. इथल्या बीचेसवर लोक सुट्टीचा सुंदर वेळ घालवतात. इथेच तुम्हाला स्कूबा डायव्हिंगचीही मजा लुटण्याचा पर्याय दिला जातो. ग्रँड आयलंड, सुझीज डेब्रिज, सेल रॉक, डेव्ही जोन्स लॉकर आणि टर्बो टनेल सारख्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही स्कूबा डायव्हिंग करू शकता.
तुमच्या राशीनुसार श्रावणात करा १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण
लक्षद्वीप
लक्षद्वीप हा स्कूबा डायव्हिंगसाठी देखील एक उत्तम पर्याय असू शकतो. येथील स्फटिकासारखे स्वच्छ पाण्यात तुम्हाला एक अतिशय सुंदर जग पाहायला मिळेल. लॉस्ट पॅराडाईज, फिश सूप, प्रिन्सेस रॉयल, क्लासरूम, मांता पॉइंट आणि डॉल्फिन रीफ हे येथील प्रसिद्ध डायव्हिंग स्पॉट्स आहेत.