१९६५ मध्ये प्लायमाउथ कंपनीने ‘सॅटेलाइट’ ही लक्झरी कार लाँच केली होती, तरी त्यांना आणखी एका प्रीमियम आणि पॉवरफुल मसल कारची गरज भासत होती. याच विचारातून १९६७ मध्ये Plymouth GTX बाजारात आली, ज्याला पुढे “द जेंटलमेन्स मसल कार” म्हणून ओळखले जाऊ लागले.
सॅटेलाइटप्रमाणेच जीटीएक्ससुद्धा फक्त टू-डोअर बॉडी स्टाइल पर्यायामध्ये उपलब्ध होती आणि यात स्टँडर्ड व्ही-८ इंजिन देण्यात आले होते. तरीही या दोन्ही मोपार कार्समध्ये मोठा फरक होता. सॅटेलाइटमध्ये लहान आकाराचे व्ही-८ इंजिन असायचे, तर जीटीएक्समध्ये तब्बल ७.२-लिटरचे (४४० क्युबिक इंच) अवाढव्य बिग-ब्लॉक इंजिन देण्यात आले होते.
मात्र, अधिक किंमतीमुळे या कारची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाली. पुढे १९७१ मध्ये क्रायस्लरने हाय-कंप्रेशन इंजिन्स टप्प्याटप्प्याने बंद केल्यावर जीटीएक्स कारचे उत्पादनही थांबवण्यात आले. पाच वर्षांच्या कालावधीत या कारचे जवळपास ४४,००० युनिट्स विकले गेले. तुलना करायची झाल्यास, प्लायमाउथने एकट्या १९६८ मध्येच ‘रोड रनर’ या मॉडेलच्या तब्बल ४४,००० गाड्या विकल्या होत्या.
दमदार आणि स्पोर्टी लुक आवडतो? २५० सीसीच्या आतील या आहेत टॉप ५ बाईक्स! त्वरा करा आत्ताच पाहून घ्या
रंगाची खास वैशिष्ट्ये आणि दुर्मिळता
१९७१ ची जीटीएक्स ही या सीरिजमधील सर्वात दुर्मिळ कार मानली जाते, ज्याचे फक्त २,९४२ युनिट्स विकले गेले होते. त्यापाठोपाठ १९७० च्या मॉडेलचा क्रमांक लागतो, ज्याचे ७,७४० युनिट्स तयार झाले होते.
सध्या चर्चेत असलेली हिरव्या रंगाची ‘हार्डटॉप’ कार या ७,७४० गाड्यांपैकीच एक आहे, पण तिच्या विशिष्ट रंगामुळे ती अत्यंत खास ठरते. ही कार ‘सॅसी ग्रास ग्रीन’ या रंगात असेंबल झाली होती. १९६९ ते १९७३ दरम्यान ऑफर केलेल्या १० हाय-इम्पॅक्ट रंगांपैकी हा एक लोकप्रिय रंग होता.
१९७० मध्ये लाँच केलेला आणि १९७१ नंतर बंद झालेला हा रंग डॉज मॉडेल्सवर ‘ग्रीन गो’ नावानेही ओळखला जायचा. ‘अमेरिकन स्टील क्लासिक कार्स’नुसार, या विशिष्ट रंगात तयार झालेल्या केवळ १६ जीटीएक्स गाड्यांपैकी ही एक आहे.
कारची टेक्निकल वैशिष्ट्ये आणि इंजिन
कारच्या हूडखाली एक छोटासा सरप्राइज बदल करण्यात आला आहे—यामध्ये ३x२-बॅरल कार्बोरेटर सेटअप बसवला आहे. त्यामुळे ही कार आता ‘सिक्स-बॅरल’ कारसारखी परफॉर्म करते.
१९७० मध्ये जीटीएक्सवर सादर करण्यात आलेले ४४० सिक्स-बॅरल इंजिन ३९० हॉर्सपॉवरची ताकद द्यायचे. हे इंजिन नेहमीच्या ४४० इंजिनपेक्षा खूप दुर्मिळ होते, ज्याचे फक्त ६७८ युनिट्स बनवले गेले होते आणि त्यापैकी केवळ ३५० गाड्यांमध्ये ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स होता.
किंमत आणि निष्कर्ष
क्लासिक मोपार कार्समध्ये कोणतेही बदल केलेले सहसा कार प्रेमींना आवडत नाहीत, तरीही या जीटीएक्समधील अपडेट त्या काळाशी सुसंगत असाच आहे. विशेष म्हणजे, इच्छा असल्यास हे बदल काढून पुन्हा कंपनीच्या ओरिजिनल स्पेसिफिकेशन्सवर कार सहज आणता येते.
तुम्हाला ही दुर्मिळ कार तिच्या सध्याच्या रुपात चालवायची असेल किंवा मूळ स्थितीत न्यायची असेल, तर यासाठी ९९,५०० अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास सुमारे ८३ लाख भारतीय रुपये मोजावे लागतील. आहे न मोठी गमतीची गोष्ट?






