पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? शरीरसंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम हळूहळू आरोग्यावर दिसू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. तर कधी रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. ऍसिडिटी, अपचन, पोट फुगणे किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. तसेच बऱ्याचदा पोटातून गुडगुड आवाज येऊ लागतो. अनेक लोक पोटातून आवाज येण्याच्या समस्येला अतिशय सामान्य समजतात. मात्र हा आवाज वारंवार येत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
45 व्या वयातही दिसाल 25 सारखे तरणेबांड, आजच सुरू करा 5 कोरियन ड्रिंक्स; सगळे विचारतील रहस्य
वारंवार पोटातून गुडगुड आवाज येण्याला मेडिकल भाषेत स्टोमक ग्रोलिंग असे म्हणतात. शरीराची पचनक्रिया सुरु होते तेव्हा पोट आणि आतड्यांमधून गुडगुड आवाज येऊ लागतो. पोटातून हा आवाज एकदा किंवा दोनदा येणे अतिशय सामान्य आहे पण वारंवार पोटातून गुडगुडण्याचा आवाज येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. ही लक्षणे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत देतात.
जेवलेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी छोट्या आतड्यांमध्ये पोहचतात तेव्हा तेव्हा शरीर अन्न तोडण्यासाठी आणि त्यातील न्यूट्रिएंट्स अॅब्जॉर्ब करण्यासाठी डायजेस्टिव एंजाइम्स रिलीज करतात. ही प्रक्रिया भूक लागल्यानंतर होते. भूक लागल्यानंतर सुद्धा पोटातून गुडगुड आवाज येऊ लागतो. हा आवाज अनेक प्रयत्न करून सुद्धा थांबत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचते.
पोटातून सतत गुडगुड आवाज येत असेल तर जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पाण्याचे सेवन केल्यानंतर थोड्या वेळाने जेवण करावे. पोटातील गुडगुड आवाज थांबवण्यासाठी दिवसातून दोनदा हर्बल चहाचे सेवन करावे. हर्बल चहा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असतो. हा उपाय नियमित केल्यास पोटातील आवाज थांबेल आणि शरीराला अनेक फायदे होतील.
पोटाचा गडगडाट म्हणजे काय?
पोटाचा गडगडाट म्हणजे भूक लागल्यास किंवा अन्न पचनाच्या प्रक्रियेदरम्यान आतड्यांमध्ये होणारे आवाज आहेत. हे सामान्य आहे, पण कधीकधी ते विशिष्ट आरोग्य समस्यांमुळे देखील होऊ शकतात.हे आवाज अनेकदा गॅस आणि द्रव्यांच्या हालचालीमुळे होतात. आतड्यांमध्ये अन्न आणि वायूंच्या हालचालीमुळे हे आवाज निर्माण होतात.
पोटाचा गडगडाट होण्याची कारणे:
जेव्हा पोट रिकामे असते, तेव्हा आतड्यांमध्ये स्नायूंची हालचाल वाढते आणि त्यामुळे आवाज येतात. अन्न पचनाच्या प्रक्रियेदरम्यान, आतड्यांमधून अन्न आणि वायू पुढे सरकतात, ज्यामुळे आवाज येतात.
पोटाचा गडगडाट कमी करण्याचे उपाय?
थोड्या थोड्या वेळाने नियमितपणे जेवल्याने पोटाचा गडगडाट कमी होऊ शकतो. पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वायू कमी होतो. हळू हळू आणि शांतपणे खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचते आणि वायू कमी तयार होतो.