वयाच्या ५० नंतर शरीरात प्रथिनांची कमतरता दिसताच शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. कारण या दिवसांमध्ये पोषक घटकांची कमतरता शरीरात निर्माण होते. ज्यामुळे हाडांचे दुखणे, सतत केस गळणे, मासिक पाळीच्या समस्या इत्यादी अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आणि पोषण आहार घेणे आवश्यक आहे. शरीरासाठी प्रथिने अतिशय महत्वाचे असतात. यामुळे आहारात प्रथिनांचे सेवन करावे. शरीरातील प्रथिने पेशी, हाडं, केस, त्वचा आणि इतर सर्वच अवयवांसाठी आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडे ठिसूळ होणे, सांधे दुखणे, चालताना तोल न जाणे, सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार आणि प्रथिने युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वयाच्या ५० मध्ये शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण असे न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. तसेच शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन जाते. याशिवाय वयस्कर वृद्धांना चालताना किंवा खाली बसताना अनेक वेदना होऊ लागतात. प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर व्यवस्थित झोप लागत नाही. झोपेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते.
वय वाढल्यानंतर काहीवेळा केस देखील गळू लागतात. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक हेअरमास्क किंवा हेअर केअर रुटीन फॉलो करतात. मात्र यासोबतच आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आहारात बदल करून आवळा, कढीपत्ता इत्यादी विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. केसांच्या पेशी निरोगी राहण्यासाठी शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते.
प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. ज्यामुळे कोणत्याही आजाराची लागण सहज होते. शरीरात अनेक बदल निर्माण होतात. वारंवार आजारपणात वाढ झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. प्रथिने असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.