काही मिनिटांच्या रागामुळे शरीरात निर्माण होतात 'हे' बदल:
शरीरात वारंवार होणाऱ्या बदलांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आणि इजा पोहचवणारा आहे. त्यामुळे बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सतत योगासने, ध्यान किंवा प्राणायाम करणे आवश्यक आहे. चुकीचा आहार, बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरसुद्धा लगेच दिसून येतो. याशिवाय कामाच्या तणावामुळे किंवा इतर गोष्टींमुळे काहींना सतत राग येतो. छोट्या मोठ्या गोष्टी किंवा कामासंबंधित चुका झाल्यानंतर काहींना सतत रागवण्याची सवय असते.रागामुळे आरोग्याचे नुकसान होते. त्यामुळे सातत्याच्या राग आणि चिडचिडवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
सतत रागवण्याची भावना त्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करू शकते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. रागवल्यामुळे माणसाच्या शरीरात होणारे बदल काहीवेळा दुर्लक्षित केले जातात. मात्र असे केल्यामुळे मानसिक आजार वाढण्याची शक्यता असते.२ मिनिटांचा किंवा काही क्षणांचा राग व्यक्तीचे जीवन पूर्णपणे खराब करू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रागवल्यामुळे शरीरात काय बदल होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
ज्यावेळी एखादी व्यक्ती सतत चिडचिड किंवा रागवत असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. शरीरामध्ये ‘कॉर्टिसॉल’ नावाच्या हार्मोनची पातळी अतिशय झपाट्याने वाढत जाते. मात्र शरीरात वाढलेली ‘कॉर्टिसॉल’ नावाच्या हार्मोनची पातळी ७ तासांपर्यंत शरीरात तसेच टिकून राहते. त्यामुळे रागावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला येणारा राग हा केवळ शारीरिक आरोग्यावरच नाहीतर मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करतो.
मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर किंवा सतत राग आल्यानंतर शरीरात वाढणारे कार्टिसोल हार्मोन हा एक प्रकारचा स्ट्रेस हार्मोन्स आहे. यामुळे शरीरात मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. या हार्मोन्सची पातळी वाढल्यानंतर चयापचय, रक्तदाब, रक्तातील साखर वाढणे इत्यादी अनेक गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात वाढलेली कार्टिसोल हार्मोनची पातळी मानसिक तणाव आणखीन जास्त वाढवते. यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य कमकुवत होऊ शकते.
शरीरात वाढलेली कार्टिसोल हार्मोनची पातळी रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करून टाकते. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ७ तासांपर्यंत कमी होऊन जाते. शरीर संसर्ग आणि आजारांसोबत लढण्यासाठी सक्षम राहत नाही. सर्दी, खोकला आणि इतर आजारांची लागण होऊन तुमचे आरोग्य आणखीनच बिघडू शकते.