पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन:
वाढलेल्या वजनाने जगभरात अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. हातांवर अतिरिक्त चरबी वाढणे, पोटाचा घेर वाढणे, शरीराच्या इतर अवयवनांवर चरबीचा घेर वाढण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात बदल करून आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक लोक वजन वाढल्यानंतर आहारतज्ञांनी दिलेला डाईट फॉलो करणे, तासनतास जीमध्ये जाऊन व्यायाम करणे, सकाळचा नाश्ता न करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चुकीच्या पद्धतीने डाईट फॉलो केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. शिवाय यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन आणखीनच वाढत जाते.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरात लठ्ठपणा वाढल्यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. शिवाय वाढलेल्या लठ्ठपणामुळे सौंदर्य कमी होऊन जाते. लठ्ठपणा वाढल्यानंतर पोटाचा घेर वाढू लागतो. ज्यामुळे कोणतेही कपडे घालताना विचार करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होईल आणि पोट स्लिम दिसेल.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरासाठी आवश्यक आहेत. आल्याचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. शरीरासाठी आलं गरम आणि कोरडे आहे. आल्याच्या सेवनामुळे भूक आणि पचन वाढवते. हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात आल्याचे सेवन करावे. आल्याचे पाणी किंवा आल्याचा चहा बनवून तुम्ही पिऊ शकता.
हळदीमध्ये आढळून येणारे क्युमिन शरीरासाठी आवश्यक आहे. रात्री झोपताना किंवा सकाळी तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक निघून जातील. तसेच वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे वाढलेले वजन कमी होऊन पोटावर वाढलेला अतिरिक्त घेर कमी होईल. हळदीच्या पाण्यात तुम्ही लिंबू पिळून ते पाणी पिऊ शकता.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक आवळ्याचा रस पितात. आवळ्याच्या रसात असलेले गुणधर्म शरीरातील अतिरिक्त घटक बाहेर काढून टाकतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात एक चमचा आवळ्याची पावडर मिक्स करून नियमित एक महिना प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील.






