बद्धकोष्ठतेमुळे वारंवार पचनक्रिया बिघडते? जाणून घ्या पोट स्वच्छ होण्यासाठी केळी खाण्याची पद्धत, पचनाचे आजार होतील गायब
केळी खाण्याची योग्य वेळ?
केळी खाण्याचे गुणकारी फायदे?
केळीमध्ये फायबर युक्त घटक असतात का?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात वारंवार होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता आणि जीवनशैलीत वारंवार होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचते. अपुऱ्या झोपेमुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. ज्याच्या परिणामामुळे पचनक्रिया बिघडते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक पोटात जमा झाल्यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी तर काहीवेळा पचनाच्या गंभीर समस्या उद्भवू लागतात. पोटाच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता योग्य ते उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी किंवा बद्धकोष्ठतेच्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात बद्धकोष्ठता वाढल्यानंतर वारंवार गोळ्या औषधांचे सेवन न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा. शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे न मिळाल्यामुळे सुद्धा पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पचनाच्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित सकाळच्या नाश्त्यात केळी खावी. केळी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आतड्यांचे कार्य चांगले ठेवण्यासाठी आणि पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित एक किंवा दोन केळी खावी. केळ्यामध्ये असलेले गुणकारी घटक आतड्यांमधील मल मऊ आणि सैल करतात, ज्याच्या परिणामामुळे पोट स्वच्छ होते आणि आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात. चला तर जाणून घेऊया पोट स्वच्छ होण्यासाठी केळी खाण्याची योग्य पद्धत.
बद्धकोष्ठतेचा त्रास वाढल्यानंतर वारंवार अपचन, ऍसिडिटी तर काहीवेळा उलट्या, मळमळ होण्याची खूप जास्त शक्यता असते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी पूर्णपणे पिकलेलं केळ खावे. पिकलेले केळ खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते. यामध्ये असलेले विद्रव्य फायबर आणि पेक्टिन युक्त घटक आतड्यांमधील मल सैलसर व मऊ करतात, ज्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. पण या उलट कच्चे किंवा कमी पिकलेले केळ खाल्ल्यास बद्धकोष्ठता कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकते. कच्च्या केळ्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च जास्त प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे कच्ची केळी पचायला अतिशय जड जातात.
केळी हे फळ नैसर्गिक फायबरने समृद्ध आहे. एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये सुमारे ३ ग्रॅम फायबर आढळून येते. याशिवाय पेक्टिन’ आणि ‘सॉल्युबल फायबर सुद्धा असतात, ज्यामुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरिया अन्न म्हणून काम करतात आणि आतड्यांची हालचाल सुलभ ठेवण्यास मदत करतात. फायबरने समृद्ध असलेली केळी खाल्ल्यास पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या आधी केळी खाल्ल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतात.
Ans: पिकलेले केळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यासोबत कोमट पाणी घेतल्यास अधिक फायदा मिळू शकतो.
Ans: पिकलेल्या केळ्यामध्ये विद्रव्य तंतू (फायबर) अधिक असल्याने ते मल मऊ करण्यास मदत करते. कच्च्या केळ्यामुळे काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता वाढू शकते.
Ans: केळ्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि प्रीबायोटिक्स असतात, जे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची वाढ करून पचन सुधारण्यास मदत करतात.






