मुलींची शारीरिक हालचाल कमी झाली असून मोबाईल, टीव्ही आणि संगणकाचा वापर वाढला आहे. त्यामुळे शरीरातील हार्मोन्स लवकर सक्रिय होतात. यासोबतच आहारातील बदलही मोठी भूमिका बजावतात. फास्ट फूड, जंक फूड, जास्त साखर, मैदा आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण वाढते. हे हार्मोन पाळी सुरू होण्याच्या प्रक्रियेला गती देते.
वाढते वजन आणि लठ्ठपणाही पाळी लवकर येण्याचे एक कारण आहे. शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असेल तर त्या चरबीच्या पेशींमधून इस्ट्रोजेन तयार होते. त्यामुळे मासिक पाळीची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा लवकर सुरू होऊ शकते. काही वेळा हार्मोनल असंतुलन, थायरॉईडचे विकार किंवा जनुकीय कारणांमुळेही हा बदल दिसून येतो. आईला लवकर पाळी आली असल्यास मुलीलाही तशीच शक्यता असते.
पर्यावरणातील बदल, प्रदूषण, प्लास्टिकचा जास्त वापर आणि रसायनयुक्त अन्नपदार्थ हे घटकही शरीरातील हार्मोनल सिस्टीमवर परिणाम करतात. त्याचबरोबर अभ्यासाचा ताण, मानसिक दबाव, भीती, चिंता आणि अपुरी झोप यामुळेही हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. याबाबत गायनॅकोलॉजिस्ट नेहा गद्रे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
अमुक तमुक या पॉडकास्टमध्ये डॉ. नेहा गद्रे यांनी मुलींना कमी वयात येणाऱ्या पाळीबाबत पालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत सांगितलं आहे.
मुलींना लवकर पाळी येण्याची कारणं म्हणजे सध्याच्या दैनंदिन जीवनातील होत असलेले बदल. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हार्मोनल असंतुलित होतात. अनेकदा डॉ. याचं कारण वाढणारं वजन असं देखील सांगतात. त्यामुळे वाढणाऱ्या वयातच कमी कॅलरीज असलेलं डाएट आणि खाण्यापिण्यावर आलेली बंधन यामुळे त्य़ांची वाढ आणि उंची देखील खुंटते.
या सगळ्याचा मुलींच्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच त्यांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होतो. अशावेळी पालकांची भुमिका सर्वात महत्वाची असते. लहानपणापासूनच मुलींना सकस आणि पोषणयुक्त आहार महत्वाचा आहे. त्यामुळे मुलींना चांगला आहार कसा मिळेल याची सवय लागणं महत्वाचं आहे. कमी वयातच पाळी येणं आता खुप सामान्य़ होत आहे. त्यामुळे पालकांनी मुलींशी संवाद चांगला ठेवणं तसंच त्यांना समजून घेणं त्यांना वेळ देणं देखील तितकंच महत्वाचं झालेलं आहे.
Ans: बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढलेलं वजन, मानसिक ताण आणि पर्यावरणातील बदल ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
Ans: होय. फास्ट फूड, जंक फूड, जास्त साखर, मैदा आणि तेलकट पदार्थांमुळे इस्ट्रोजेन हार्मोन वाढते, ज्यामुळे मासिक पाळी लवकर सुरू होते.
Ans: . शरीरात जास्त चरबी असल्यास त्यातून इस्ट्रोजेन हार्मोन तयार होते. त्यामुळे पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकते.






