उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर शरीरसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. चुकीची जीवनशैली, सतत बाहेरचे पदार्थ, झोपेकडे लक्ष न देणे, कामाचा तणाव इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. अनेकांना बीपी वाढणे किंवा कमी होण्याचा त्रास असतो. याला अनेक कारणसुद्धा आहेत. जीवनशैलीतील बदलांमुळे खूप कमी वयात अनेकांना बीपीचा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. पूर्वीच्या वयाच्या ६० नंतर होणारे आजार हल्ली 20 व्या वर्षातील मुलांमुलींना होत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत योग्य जीवनशैली जगणे आवश्यक आहे. शरीरातील रक्तदाब योग्य वेळी नियंत्रणात आला नाहीतर मेंदूच्या नसा फुटण्याची शक्यता असते.
उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानंतर दुर्लक्ष केल्यास हा आजार आणखीन गंभीर होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब वाढल्यानंतर आणि रक्तदाब कमी झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय उच्च रक्तदाब वाढल्यानंतर केल्यास आराम मिळेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: गाजर खाण्याचे आहेत अनेक फायदे, निरोगी आयुष्यासाठी आजच जाणून घ्या
शरीरामध्ये रक्तदाब वाढल्यानंतर तीव्र डोके दुखी, चक्कर येणे, घाम फुटणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. या सर्व समस्या जाणवू लागल्यानंतर रक्तदाब वाढलेल्या व्यक्तीला हवेत किंवा पंख्याच्या खाली बसवावे. त्यानंतर त्याला पाणी पिण्यास द्यावे. यामुळे रुग्णाला काही वेळ आराम मिळतो. पण नुसतेच घरगुती उपाय करून न थांबता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.
उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. जर तुम्हाला व्यायाम किंवा योगा करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही एरोबिक्स व्यायाम सुद्धा करू शकता. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी मिठाचे जास्त सेवन करू नये. मिठाचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरत. भाज्या, फळे, कोशिंबीर इत्यादी पौष्टीक पदार्थ खावेत.
हे देखील वाचा: बदाम सालासकट खावे की सालाशिवाय?
अचानक घरी असताना किंवा ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब वाढल्यास त्याला तातडीने लिंबू पाणी द्यावे. यामुळे वाढलेला रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पण लिंबू पाणी देताना त्यात मीठ किंवा साखर टाकू नये. उच्च रक्तदाब वाढलेल्या व्यक्तीला २ ते ३ ग्लास लिंबू पाणी पिण्यास द्यावे. यामुळे शरीरातील लघवी निघून आराम मिळेल.