सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' पाण्याचे सेवन
शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल ची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता अस्ते. शरीरामध्ये दोन प्रकारचे कॉलेस्ट्रॉल आढलून येतात. त्यातील एक म्हणजे चांगले कॉलेस्ट्रॉल आणि खराब कॉलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्टेॉल शरीरासाठी आवश्यक आहे. कारण यामुळे शरीरात चांगले आणि निरोगी पेशी तयार होतातशरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे हृदयाचे नुकसान होण्यास सुरुवात होते. शरीरात कोलेस्ट्रॉलची समस्या वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका, पक्षाघात इत्यादी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित इतर अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे रोजच्या आहारात कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करावे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होतो. ज्यामुळे शरीरासह हृदयाच्या रक्तवाहिन्यासुद्धा ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.
शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चिकट मेणासारखा थर जमा होण्यास सुरुवात होते. हा थर वाढल्यानंतर हृदयाचा रक्तपुरवठा कमी होऊ लागतो. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आहारात आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. आल्याच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आल्याच्या पाण्यात दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. हा घटक शरीर स्वच्छ करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी टोपात पाणी गरम त्यात किसलेलं आलं टाकून व्यवस्थित पाण्याला उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. तयार केलेल्या आल्याच्या पाण्यात मध मिक्स करून प्या. यामुळे शरीरातील घाण स्वच्छ होईल. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याचे पाणी अतिशय प्रभावी आहे. हे पाणी उपाशी पोटी प्यायल्यास अनेक फायदे होतील.
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असल्यामुळे शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गरम पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दैनंदिन आहारात आल्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास बिघडलेली पचनक्रिया सुधारून आरोग्य सुधारेल.