Khari Recipe : तुम्ही चहासोबत बेकरी स्टाईल खारी तर अनेकदा खाल्ली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? हा पदार्थ तुम्ही घरीदेखील अगदी सोप्या पद्धतीने तयार करु शकत. ही रेसिपी फाॅलो करुन घरीच महिनाभर साठवता येईल इतकी खुशखुशीत खारी बनवू शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
भारतीय घरांमध्ये चहासोबत खारी हा स्नॅक्सचा प्रकार फार लोकप्रिय आहे.
खारी हा पदार्थ तुम्ही घरीदेखील तयार करु शकता.
यासाठी सोपी पद्धत फाॅलो करावी लागेल.
खारी हा अनेकांच्या आवडीचा हलका, कुरकुरीत आणि चविष्ट बेकरी पदार्थ आहे. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत खारी खाण्याची मजाच काही वेगळी असते. तिचे अनेक प्रकार बाजारात मिळतात, मात्र घरी बनवलेली खारी अधिक ताजी, स्वच्छ आणि आपल्या आवडीनुसार तयार करता येते. मुख्य म्हणजे यासाठी फार वेळेची किंवा साहित्याची गरज लागत नाही. तुमच्या निवडक साहित्यापासून घरीच महिनाभर साठवून खाता येऊ इतकी खरी तयार करू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया. चला स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया रेसिपी.