सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी
वाढलेले वजन कमी करताना आहारात अनेक पदार्थ खाणे टाळले जाते. मात्र आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन न केल्यामुळे शरीरातील आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होऊ लागते. याशिवाय अनेक लोक वजन वाढेल म्हणून सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या नाश्त्यात हेमदी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात ब्लूबेरी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या स्मूदीमध्ये आवश्यक घटक आढळून येतात. ब्लूबेरीमध्ये फायबर आणि प्रथिने इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय या स्मूदीचे सेवन केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि शरीरात वाढलेली जळजळ कमी होते. सकाळच्या वेळी पोट भर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया ब्लूबेरी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा नारळाच्या दुधातले पोहे, नोट करून घ्या रेसिपी