मैदा किंवा साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट चॉकलेट मग केक
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडते. चॉकलेट केक, रेड वेलवेट केक, रसमलाई केक इत्यादी अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक बाजारात उपलब्ध आहेत. वाढदिवस किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी केक विकत आणून खाल्ला जातो. पण कायमच मैदा आणि साखरेचा वापर करून बनवलेला केक खाण्याऐवजी घरच्या घरी सुद्धा तुम्ही केक बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला साखर आणि मैद्याचा वापर न करता केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा केक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या वाढते. त्यामुळे आहारात मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे. सगळ्यांचं चॉकलेट केक खायला खूप जास्त आवडतो. पण वजन वाढेल या भीतीने केक खाल्ला जात नाही. त्यामुळे केक बनवताना कोणत्याही प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर न करता सहज पचन होणाऱ्या आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया चॉकलेट केक मग केक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा हाय प्रोटीन ‘बाजरी मुंगलेट’, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात






