उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी काकडीचे सॅलड
वाढलेले वजन शरीरासाठी अतिशय घातक आहे. कारण शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय वजन वाढल्यानंतर बऱ्याचदा महिलांना नेमके कोणते कपडे परिधान करावे? सीव्हील्स घातल्यानंतर शरीरावर वाढलेली चरबी दिसणार तर नाहीना? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होतात. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले प्रोटीनशेक, गोळ्या औषध इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात काकडीचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले काकडी सॅलड नियमित 30 दिवस खाल्यास शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.(फोटो सौजन्य – iStock)
रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की, नोट करून घ्या रेसिपी