सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'ड्राय-फ्रुट्स मिल्कशेक'
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह अगदी मोठ्यांना नेहमी नेहमी काय खायला द्यावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही नाश्त्यासाठी ड्राय फ्रुट मिल्कशेक बनवू शकता. निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर ड्राय फ्रूटचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काजू, बदाम, अंजीर, पिस्ता इत्यादी ड्राय फ्रुटचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वाढलेला थकवा अशक्तपणा कमी होऊन जातो. अनेक लोक वाढलेला वजन कमी करताना सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र असे न करता सकाळच्या नाश्त्यात ड्राय फ्रुट, स्मूदी किंवा मिल्कशेक प्यावे. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया ड्राय फ्रुट मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल थंडगार बीटची कांजी! पारंपारिक पद्धतीने तयार करा पेय
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा शेवगा फ्राय, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ