कडक उन्हात शरीराला थंडावा हवा आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा Ginger Ice Tea, नोट करून घ्या रेसिपी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी फ्रेश आणि कायमच ताजेतवटवीत राहण्यासाठी वेगवेगळ्या थंड पेयांचा आहारात समावेश केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी जिंजर आईस टी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आईस टी किंवा थंड कॉफी पिण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच कॅफे किंवा कोणत्याही रेस्टोरंटमधून मागवली जाते. बाजारात विकत मिळणाऱ्या आईस टी मध्ये अतिरिक्त साखर आणि रासायनिक घटकांचा सुद्धा समावेश असतो, यामुळे शारीरिक हानी पोहचू शकते. त्यामुळे नेहमीच विकतची आईस टी आणून पिण्याऐवजी घरी बनवलेली जिंजर आईस टी प्यावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ






