उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा ज्वारीच्या पिठाचे थंडगार आंबील
वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी दैनंदिन आहारात थंड पदार्थांचे सेवन केले जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पोटात गारवा निर्माण होतो. याशिवाय उन्हाळ्यात पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पचनास हलके आणि चविष्ट पदार्थ खावे. उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेक घरांमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर करून आंबील बनवले जाते. आपल्यातील अनेकांनी या रेसिपीचे नाव देखील ऐकले नसेल. ज्वारी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. ज्वारीच्या धान्यांचा वापर करून पीठ तयार केले जाते. नंतर त्याच पिठाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ज्वारीमध्ये फायबर, जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात, त्यामुळे दैनंदिन आहारात ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाचे आंबील बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोणत्या वरदानाहुन कमी नाही ‘ही’ हिरवी चटणी; लगेच नोट करा रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिजी कॉर्न, चहासोबत लागेल सुंदर चव