मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे गारवा निर्माण होतो. थंड वातावरणामुळे प्रत्येकाला काहींना काही गरमागरम आणि झणझणीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी जेवणाच्या ताटात चटणी किंवा मसाल्यात तेल घालून खाल्लेले जाते. पण नेहमीच मसाला खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे इतर पदार्थ बनवून खावेत. आज आम्ही तुम्हाला मराठवाड्यात बनवला जाणारा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जेवणाच्या ताटात गरमागरम भाकरी किंवा डाळभातासोबत ठेचा अतिशय सुंदर लागेल. पण काळ्या हिरव्या मिरच्या चवीला अतिशय तिखट असतात. त्यामुळे योग्य प्रमाणातच पदार्थांचे सेवन करावे. मराठवाड्यातले लोक कायमच तिखट पदार्थांचे सेवन करतात. हिरव्या मिरच्यांचा वापर करून बनवलेला ठेचा २ आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. ठेचा बनवताना अजिबात पाण्याचा वापर करू नये. चला तर जाणून घेऊया झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट






