बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचं चमचमीत पिठलं
भारतात बनवले जाणारे सर्वच मराठमोळे पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. त्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जेवणात पिठलं भाकरी खायला खूप आवडते. बेसन आणि हिरव्या मिरचीचा तडक देऊन बनवलेले पिठलं चवीला अतिशय सुंदर लागत. पण आज आम्ही तुम्हाला बाजरीचे पीठ टाकून मेथीचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना मेथीची भाजी खायला आवडत नाही. मेथीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलं नाक मुरडतात. पण पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. कोकणात पालेभाज्या बनवताना त्यात नारळाचा किस घातला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला बाजरीचे पीठ घालून मेथीचं पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चिजी एग टोस्ट, नोट करून घ्या सोपी रेसिपी