सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गरमागरम नाचणीचे सूप
हिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सर्दी खोकला किंवा ताप आल्यानंतर काहीच खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. आजारपणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. अशावेळी शरीराला पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणीसाजे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी आरोग्यासाठी पौष्टिक आहे. नाचणीच्या पिठाचा वापर करून नाचणीची भाकरी, लाडू, नाचणी सत्व इत्यादी पदार्थ बनवले जातात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थ खाण्याऐवजी गरम पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नाचणीमध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम अशी शरीराला आवश्यक असणारी सर्व गुणधर्म आढळतात. मधुमेहचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात नाचणीचे सेवन करावे. यामुळे मधुमेहाची पातळी नियंत्रणात राहून आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. वजन कमी करण्यासाठी नाचणीचे सेवन तुम्ही आहारात करू शकता.चला तर जाणून घेऊया नाचणीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा