लाल मिरच्यांपासून बनवा वर्षभर टिकणारे आंबट गोड लोणचं
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडते. लोणच्याचे सेवन जेवणात केल्यास जेवणात दोन घास जास्त जातात आणि लोणचं सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांपासून लोणचं बनवलं जात. कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, आल्याचे लोणचं, लसूण लोणचं इत्यादी अनेक लोणच्याचे प्रकार बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लाल मिरच्यांचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लाल मिरच्यांचा वापर मसाला बनवण्यासाठी केला जातो. मात्र असे नसून तुम्ही या मिरच्यांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. जेवणात डाळ भात किंवा चपातीसोबत तुम्ही लोणचं खाऊ शकता. लोणचं बनवताना त्यात भरपूर तेलाचा वापर केला जातो. मात्र आम्ही तुम्हाला कमीत कमी तेलात लोणचं कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गावराण स्टाईल आंबट-तिखट टोमॅटोचा सार; गरमागरम भातासोबत अप्रतिम लागेल






