सोप्या पद्धतीमध्ये बनवा भरलेली शिमला मिरची
रोजच्या आहारात भात, डाळ, भाजी, चपाती इत्यादी पदार्थ नियमित बनवले जातात. या पदार्थांपैकी एकही पदार्थ जर जेवणात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटत नाही. रोजच्या जेवणात घरी प्रामुख्याने कडधान्य आणि भाज्या बनवल्या जातात. सतत कडधान्य आणि त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भरलेली शिमला मिरची बनवू शकता. शिमला मिरची आरोग्यसाठी पौष्टिक असून शिमला मिरचीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शिमला मिरचीमध्ये विटामिन सी असते, ज्यामुळे त्वचा आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया भरलेली शिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: लोहयुक्त डाळिंबापासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा डाळिंब मोहितो, वाचा सोपी रेसिपी