पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव
आंबटगोड चवीचे चिंच खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चिंच पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. जेवणातील विविध पदार्थ बनवताना चिंचेचा वापर केला जातो. बऱ्याचदा घरात संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी खाण्यासाठी वडापाव, सामोसा किंवा टिक्की बनवली जाते. सामोसासोबत कायमच हिरवी चटणी किंवा चिंच चटणी खाल्ली जाते. पण घरी बनवलेल्या चटणीला विकतसारखी चव लागत नाही. म्हणून चटणी विकत आणली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाजारात मिळणारी आंबटगोड चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. तयार केलेली चिंच चटणी तुम्ही महिनाभर फ्रिजमध्ये व्यवस्थित साठवून ठेवू शकता. चटणी तयार करताना पाण्याचा अजिबात वापर करू नये, अन्यथा चटणी खराब होऊ शकते. तयार केलेली चटणी कायमच काचेच्या हवा बंद डब्यात भरून ठेवावी. यामुळे पदार्थ लवकर खराब होत नाही आणि चटणी व्यवस्थित टिकून राहते. चिंच चटणी तुम्ही ढोकळा, कचोरी, भजी, वडे, दहीवडे, पकोडे, आलू टिक्की, पापडी चाट, शेवपुरी, रगडा पॅटिस, कटलेट इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






