हिरव्यागार मटारपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चमचमीत टिक्की
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मटार उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मटार खायला खूप जास्त आवडतात. कारण मटार चवीला गोडसर असतात. मटारपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी मटार टिक्की तर कधी मटार पनीर बनवून जेवणाची चव वाढवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला मटारपासून टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं कायमच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी कायमच सहज पचन होणारा आणि चविष्ट पदार्थ खावा. मटार पराठा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर आणून घेऊया मटार टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार






