मोसंबीची साल कचरा म्हणून फेकून देत असाल तर थांबा! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी 'या' पद्धतीने करा सालीचा वापर
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. मोसंबी, संत्री, सफरचंद इत्यादी फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आहारात प्रामुख्याने विटामिन सी असलेल्या फळांचे सेवन करावे. विटामिन सी युक्त फळे खाल्ल्यामुळे आरोग्य चांगले राहते, चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहतो. पण वातावरणात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पोषक घटकांची कमतरता, कामाचा वाढलेला तणाव, धूळ माती प्रदूषणामुळे त्वचेच्या असंख्य वाढू लागतात. चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट तर कधी महागडे स्किन केअर वापरून त्वचेची काळजी घेतात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्वचेची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन जातो आणि त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पुरळ आणि डाग घालवण्यासाठी महिला कायमच विटामिन सी युक्त फेसवॉश किंवा फेस सिरमचा वापर करतात. पण यामुळे फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मोसंबीच्या सालीचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. मोसंबी आणल्यानंतर त्याच्या वरील साल काढून फेकून दिली जाते. पण साल फेकून देण्याऐवजी या पद्धतीने तुम्ही मोसंबीच्या सालीचा फेसपॅक त्वचेला लावण्यासाठी बनवू शकता.
सर्वप्रथम, मोसंबीच्या साली सोलून उन्हात दोन ते तीन दिवस वाळवण्यासाठी ठेवा. साली व्यवस्थित कडक झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. सालींची पावडर तयार करा. ही पावडर तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. वाटीमध्ये तयार केलेली मोसंबीची पावडर घेऊन त्यात गुलाब पाणी आणि थोडस दही घालून पेस्ट तयार करा. घट्टसर पेस्ट तयार केल्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी हलक्या हाताने मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि फोड कमी होण्यासोबतच चेहऱ्यावरील काळे डाग नष्ट होतील.
मोसंबीच्या सालीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होतात. कारण यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी ने समृद्ध असलेल्या मोसंबीच्या सालीचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहरा उजळदार आणि देखणा दिसेल. मोसंबीच्या सालीचा वापर केवळ फेसपॅक बनवण्यासाठी नाहीतर स्वच्छता आणि दुर्गंधीनाशक म्हणून सुद्धा केला जातो. स्वयंपाक घरातील मायक्रोवेव्ह किंवा रेफ्रिजरेटरमधून विचित्र घाणीचा वास येत असल्यास वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात संत्र्याची साल ठेवा आणि काहीवेळ मायक्रोवेव्ह चालू करा. यामुळे दुर्गंधीचा कुबट वास नष्ट होण्यास मदत होईल.
घरात कायमच प्रसन्न वातावरणात टिकून राहावे, यासाठी रूम फ्रेशनर वापरले जाते. पण बाजारात मिळणारे महागडे आणि केमिकल युक्त रूमफ्रेशनर वापरण्याऐवजी मोसंबीच्या सालीचा वापर करून बनवलेले रूमफ्रेशनर वापरावे. यामुळे घरात येणारा कुबट वास किंवा दुर्गंधी नष्ट होऊन जाईल. मोसंबीच्या सालीचा वापर विविध पद्धतीने केला जातो. हे आपल्यातील अनेकांना माहित नाही. त्यामुळे मोसंबीच्या आतील गर काढून खाल्ल्यानंतर साल फेकून दिली जाते.






