सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी केशर बासुंदी
राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळी सणाचा मोठा उत्साह आहे. यंदाच्या वर्षी १७ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. या दिवसांमध्ये घरात पाहुण्यांच्या मोठ्या प्रमाणावर ये जा असते. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कायमच काहींना काही गोड पदार्थ बनवले जातात. शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ला इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण कायमच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये केशर बासुंदी बनवू शकता. बासुंदीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. दूध आणि खव्याचा वापर करून बनवलेली बासुंदी चवीला अतिशय सुंदर लागते. बासुंदी तुम्ही पुरीसोबत किंवा नुसतीच सुद्धा खाऊ शकता.कायमच फराळातील पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये केशर बासुंदी बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)