Health Tips: जेवल्यानंतर लगेच करू नका ‘या’ चुका, नाहीतर स्वतःच्या हाताने द्याल आजारपणाला आमंत्रण
हवेत असलेली जास्त आर्द्रता केसांमधील ओलाव्याचे संतुलन बिघडवते. त्यामुळे केस विस्कटलेले आणि फ्रिझी दिसू लागतात. नैसर्गिकरित्या कुरळे किंवा कोरडे केस असलेल्या व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक जाणवू शकते.
पावसाचे पाणी, स्कॅल्पवर साचलेली धूळ, घाम आणि अतिरिक्त तेल यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केस कमकुवत होऊन गळणे आणि तुटणे वाढू शकते. ओल्या केसांवर जोरात कंगवा फिरवल्यानेही केस सहज तुटतात.
पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने केस धुवावेत. टाळू स्वच्छ ठेवल्याने घाण, प्रदूषण आणि अतिरिक्त तेल साचत नाही. यामुळे कोंडा आणि संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते.
शॅम्पूनंतर हलका कंडिशनर किंवा हेअर सीरम वापरल्यास केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. त्यामुळे केस मऊ राहतात आणि फ्रिझीपणा कमी होण्यास मदत मिळते.
ओले केस अधिक नाजूक असतात. त्यामुळे टॉवेलने जोरात घासू नका, तसेच ओल्या केसांवर गरम स्टायलिंग उपकरणांचा वापर टाळा. केस नैसर्गिकरीत्या सुकू द्या किंवा मऊ टॉवेलने हलक्या हाताने कोरडे करा.






