(फोटो सौजन्य: istock)
प्रवास हा आपल्या आरोग्यसाठी चांगला मानला जातो, ज्यामुळे कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत किंवा प्रियजनांसोबत फिरायला गेलेच पाहिजे. अनेकदा लोक फिरायला जाण्याचा प्लॅन तर करतात मात्र बजेट नीट बसलं नाही की मग हाच प्लॅन रद्द करतात. कुठेही जायचे म्हटले की, प्रवासाचा, खाण्या-पिण्याचा खर्च हा येतोच. अशातच आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही ठिकाणांची माहिती सांगत आहोत जिथे तुम्हाला राहण्याची किंवा जेवणाची चिंता करण्याची काहीच गरज भासणार नाही. तसेच इथे तुम्ही तुमचा प्रवास अगदी मुक्त आणि काळजीशिवाय पूर्ण करू शकता. चला हे कोणते ठिकाण आहेत ते जाणून घेऊया.
समुद्राच्या आतील जग पाहिलं आहे का? या ठिकाणी घेता येईल Scuba Diving चा उत्कृष्ट अनुभव
गुरुद्वारा मणिकरण साहिब, हिमाचल प्रदेश
भारतातील हिमाचल प्रदेश हे ठिकाण फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण मानले जाते. बर्फाने भरलेला हा डोंगराळ प्रदेश आणि येथील शांत थंड हवा मनाला सुख देऊन जाते. अनेक विदेशी पर्यटक देखील दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देतात. तुम्हीही इथे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला इथे राहण्याची आणि जेवणाची काळजी करण्याची गरज नाही. इथे राहण्यासाठी किंवा जेवणासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. प्रत्यक्षात गुरुद्वारा मणिकरण साहिब या राज्यातील कुल्लू येथे आहे, जिथे फ्रीमध्ये तुमच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. इथल्या लंगरमध्ये तुम्ही मोफत जेवण करू शकता. यासोबतच, तुम्ही तीर्थन व्हॅली, हनोगी माता मंदिर, खीरगंगा, बिजली महादेव मंदिर आणि कैसधर यासह अनेक ठिकाणी भेट देऊ शकता.
आनंदाश्रम, केरळ
यासहच जर तुम्ही केरळमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर इथल्या आनंदाश्रमात तुमच्या राहण्याची आणि जेवणाची सोय होऊ शकते. आनंदाश्रम हे केरळमधील एक अध्यात्मिक आश्रयस्थान आहे. स्वामी रामदास आणि आई कृष्णाबाई यांनी 1931 मध्ये याची स्थापना केली. हे कन्हानगड शहरात, कासारगोड जिल्ह्यात आहे. येथे राहण्यासाठी आणि जेवणाची सोय मोफत आहे.
श्री रामनाश्रम, तामिळनाडू
दक्षिण भारतातील तामिळनाडू हे ठिकाण फिरण्यासाठीचे एक लोकप्रिय ठिकाण आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक या ठिकाणाला भेट देतात. अशात तुम्हीही फिरण्यासाठी इथे जात असाल तर येथील श्री रामनाश्रममध्ये मोफत तुमच्या राहण्याची सोया होऊ शकते. श्री रामनाश्रम हे येथील एक मुख्य धार्मिक स्थळ मानले जाते. येथे तुम्ही तिरुवन्नमलाई मंदिर, विरुपाक्ष गुहा आणि श्री रामनाश्रमसह अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.
ईशा फाउंडेशन, तामिळनाडू
तामिळनाडूमधील कोइम्बतूर देखील फिरण्यासाठीचे एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. तुम्ही इथे जात असाल तर तुम्हाला राहण्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही. इथे गेलात तर तुम्ही ईशा फाउंडेशनमध्ये मोफत राहू शकता. हे कोइम्बतूरपासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे. हे सद्गुरुंचे एक धार्मिक केंद्र आहे. येथे तुम्हाला आदियोगी शिवाची एल सुंदर आणि मोठी मूर्ती पाहायला मिळेल.