तज्ज्ञांच्या मते शरीरात मेलानिन नावाचे पिगमेंट कमी होऊ लागल्यास केसांचा नैसर्गिक काळा रंग कमी होतो. यामागे पोषणाची कमतरता, धूम्रपान, जास्त तणाव, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांचा अति वापर कारणीभूत ठरू शकतो. परंतु, अनेकदा ही समस्या आनुवंशिक कारणांमुळेही उद्भवू शकते.
हिरव्या भाज्या, अंडी, ड्राय फ्रुट्स, दूध, दही आणि प्रोटीनयुक्त पदार्थ केसांसाठी फायदेशीर मानले जातात. शरीरात व्हिटॅमिन B12, आयरन आणि झिंकची कमतरता असल्यास केस लवकर पांढरे होऊ शकतात. त्यामुळे दररोजच्या जीवनात संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
अत्याधिक तणावाचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. योग, मेडिटेशन आणि नियमित व्यायामामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते तणाव नियंत्रित ठेवल्यास केस अकाली पांढरे होण्याचा वेग कमी होऊ शकतो.
नियमित तेल मालिश आणि स्कॅल्प मसाज केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते. नारळ तेल, बदाम तेल किंवा आवळा तेल वापरल्यास केस मजबूत राहण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हलक्या हाताने मसाज करणे फायदेशीर ठरू शकते.
जास्त प्रमाणात हेअर कलर, स्ट्रेटनिंग किंवा केमिकलयुक्त शॅम्पू वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
पुरेशी झोप, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि कमी ताण तणाव असलेली जीवनशैलीमुळे केसांचे आरोग्य सुधारू शकते. वेळेवर काळजी घेतल्यास अकाली पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips: हिमोग्लोबिन कमी आहे? रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल रक्ताची कमतरता






