(फोटो सौजन्य: istock)
फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण
वजन कमी करण्यास उपयुक्त
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे पोट अधिक काळ भरल्यासारखे वाटते. जास्तीचे खाणे टाळायचे असेल तर आपल्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करा. आरोग्य तज्ञांच्या मते, दिवसातून एक ते दोन चमचे भोपळ्याच्या बिया खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
चयापचय वाढवा
भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी चरबी असतात जी शरीरातील चयापचय गतिमान करण्यास मदत करतात. कॅलरीज बर्न करण्यासाठी याचे सेवन एक चांगला पर्याय ठरु शकते. भोपळ्याच्या बिया सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकतात किंवा ते हलके भाजून नाश्ता म्हणून खाऊ शकतात. काही लोक भोपळ्याच्या बिया सॅलड, दही, स्मूदी किंवा दलियामध्ये खातात, तर काही लोक ते पाण्यात भिजवून त्यांचे सेवन करतात.
केसांचे आरोग्य सुधारते
आजकाल केस गळणे एक सामान्य समस्या बनली आहे. भोपळ्याच्या बियांमधील झिंक आणि फायटोन्यूट्रिएंट्स असते जे केसांना मुळापासून मजबूत करण्यात मदत करते. याचे सेवन केसांना पोषण मिळवून देते ज्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की, भोपळ्याच्या बियांचे सेवन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






