उन्हाळ्यात निरोगी आरोग्यासाठी 'या' फळांचे न चुकता करा सेवन
कडक उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. कारण या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन जाते. याशिवाय शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर थकवा जाणवणे, अशक्तपणा किंवा वारंवार चक्कर येऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात पोषण आहार घेतल्यास शरीरसंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित पालेभाज्या, फळे, दूध, दही, ताक, सरबत, नारळ पाणी इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे. याशिवाय या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी या फळांचे नियमित सेवन करावे. या फळांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढून थकवा अशक्तपणा दूर होईल. जाणून घ्या कोणत्या फळांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित करा ‘ही’ योगासने, जीवन होईल तणावमुक्त
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. फळांचा राजा म्हणून सगळीकडे आंब्याची ओळख आहे.आंब्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेला फळांचा राजा सगळीकडेच आवडीने खाल्ला जातो. आंब्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आंब्याचा आमरस, आंब्याचं सांदण, आंबा वडी, आंबापोळी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आंबा खाल्यामुळे शरीरात ग्लुकोजची पातळी वाढण्यास मदत होते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी उन्हाळ्यात नेहमी कलिंगड खावे, कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते. याशिवाय यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि अशक्तपणा थकवा कमी होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे अ, क आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. स्नायूंमध्ये वाढलेला थकवा दूर करण्यासाठी नियमित कलिंगड खावे.
उन्हाळ्यात बाजारामध्ये जांभूळ उपलब्ध असतात. चवीला तुरट लागणारी जांभळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभळं खावीत. यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. जांभूळामध्ये विटामिन सी, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभूळ खावे. याशिवाय बाजारात जांभूळ चूर्ण सुद्धा उपलब्ध आहे.
ताडगोळे खाणे सगळ्यांचं खूप जास्त आवडते. ताडगोळ्यांमध्ये असलेले पाणी शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही ताडगोळ्यांचे सेवन करू शकता. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात ताडगोळे उपलब्ध असतात. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात ताडगोळ्यांचे सेवन करावे.