शरीरसाठी सकस आहार आहे आवश्यक (फोटो- सोशल मीडिया/istockphoto)
Health Tips: हल्ली आपले जीवन अधिक धावपळीचे झाले आहे. ऑफिसचे कामामुळे जेवणाच्या वेळा पाळल्या न जाणे, कामाच्या व्यापामुळे व्यायाम करण्यासाठी किंवा अन्य आरोग्याला फायदेशीर गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार देखील महत्वाचा आहे. चांगला आहार देखील शरीरसाठी फायदेशीर ठरतो. दरम्यान दीर्घकाळ जगण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी एक शक्तिशाली ज्यूस सांगितला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
आपल्या आहारात अनेक चांगले पदार्थ खात असतो. त्यातील काही पदार्थ हे खूप फायदेशीर असतात. त्यातीलच एक म्हणजे दुधीभोपळा. तुम्ही सात्विक आहाराचे सेवन केल्यास तुमच्या शरीरास ऊर्जा मिळते. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी दुधीभोपळा शरीराला फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तयके सेवन केले पाहिजे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते.
लहान मुलांना दुधी भोपळा खाण्यास दिला पाहिजे. दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. जर का तुम्हाला दीर्घकाळ जगायचे असेल तर तुम्ही दुधीभोपळ्याचा ज्यूस प्यायला पाहिजे, असे सांगितले जात आहे.
दुधी भोपळ्याचा ज्यूस पिण्याबाबत डॉक्टर विमल छाजेर म्हणतात, “पांढरा भोपळा शरीरसाठी फायदेशीर ठरतो. यामध्ये 96 टक्के पाणी असते. यामध्ये फायबर, मॅग्नेशिअम, आणि व्हिटॅमिन असते. याचे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. एका रिपोर्टनुसार याचे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होते.
रोज एक ग्लास दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यायलयास शरीरास अनेक फायदे होतात. काही आठडवे याचे सेवेन केल्यानंतर याचा फायदा दिसू लागतो. सकाळी हा ज्यूस प्यायलास शरीरात थंडावा राहतो आणि दिवासभर ऊर्जा राहते.
दुधी भोपळ्याचा ज्यूस कोणी पिऊ नये?
ज्या लोकांना अस्थमा, सर्दी किंवा खोकला लगेच होतो, त्या लोकांनी या ज्यूसचे सेवन केल्यास त्यांना सर्दी होऊ शकते. कारण यामुळे शरीरात थंडावा राहतो. अशा लोकांनी ज्यूसमध्ये मध्य किंवा काली मिरी घालून त्याचे सेवन केले पाहिजे.
1 महिन्यात 20 किलो वजन होईल कमी वितळेल चरबी
वजन वाढणे किंवा लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की लठ्ठपणा कर्करोगापासून ते हृदयविकारापर्यंत अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचे कारण आहे. वजन वाढल्याने फक्त आजार होतात असं नाही तर वजन वाढल्यानंतर आपले सौंदर्यदेखील नष्ट करते आणि याशिवाय वाढलेले वजन हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवते. पण एकदा वाढलेले वजन कमी करणे सोपे नाही. जिममध्ये तासनतास घाम गाळून, महागड्या डाएट प्लॅनचे पालन करून आणि अनेक उपाय करूनही बऱ्याच लोकांचे वजन कमी होत नाही
1 महिन्यात 20 किलो वजन होईल कमी वितळेल चरबी; Baba Ramdev यांनी सांगितला सपाट पोटाचा रामबाण उपाय
महत्वाची टीप: वरील लेखात दिलेली माहिती आणि सल्ला हे केवळ सामान्य आहे. या ज्यूसचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.